जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्हा ग्रामीण व शहर आढावा बैठक उत्साहात पार पडली.
नुकतेच जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठकीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या खान्देश दौऱ्याची सुरुवात झाली.जळगाव जिल्हा आणि शहर समता परिषद पदाधिकारी व समता सैनिक यांची ही आढावा बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील
पूर्ववत झालेले ओबीसी आरक्षण आणि जातनिहाय जनगणना यांच्या अनुषंगाने ओबीसी व अठरापगड समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली,तसेच त्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या.यावेळी जळगाव जिल्हा आणि शहर पदाधिकारी व समता सैनिकांनी देखील आपली मते व भूमिका मांडली. सर्वांनी एकजुटीने ओबीसी हक्कांचा हा विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक,डॉ. नागेश गवळी,प्रा.संतोष विरकर, अशोक खलाणे, ज्ञानेश्वर महाजन,सतीश महाजन,संतोष माळी,वसंत पाटील,कृष्णा माळी,कैलास महाजन,प्रकाश महाजन,प्रताप महाजन, निवेदिता ताठे,अभिलाषा रोकडे, सारिका माळी, शालिग्राम मालकर,भूषण महाजन,सारिका शिंपी, पवन माळी,यज्ञेश बाविस्कर,उमेश महाजन,भिला महाजन,पुष्पा महाजन, मोनालिका पवार आदी उपस्थित होते.
