बाभळी बंधारा प्रश्नी जलसंपदा मंत्र्यांची सकारात्मक भेट

Cityline Media
0
नांदेड सिटीलाईन न्यूज नेटवर्क बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, जमीन संपादन प्रक्रिया व या बंधाऱ्याचे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वाचवण्यासाठी उपलब्ध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पा.यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून बाभळी बंधारा धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे बुडित होणारी जमीन तत्काळ अधिग्रहण करुन शेतकरी बांधवांची कायम स्वरूपीसाठी या त्रासातून सुटका करावी.सोबतच बंधा-यातील पाणी सोडण्याच्या गेटच्या तारखा बदलल्यानंतर होणा-या पाणी साठ्यासाठी नायगाव तालुका व उमरी तालुक्यातील उमरी पट्टी भागासाठी नवीन उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात याव्यात,अशी देखील मागणी केली. 

मंत्रीमहोदयांनी सविस्तर चर्चेअंती संबंधित प्रश्नी अत्यंत सकारात्मकता दर्शवली असून मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा-महायुती सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न लवकर मार्गी लागेल,हा विश्वास वाटतो.यावेळी राज्यसभा खासदार जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव.दीपक कपूर यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!