नाशिक दिनकर गायकवाड शालिमार येथून पायी जाणाऱ्या मुलीस पाठीमागून धक्का मारून तिचा विनयभंग करणाऱ्या सायखेड्याच्या तरुणास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुलगी ही १९ वर्षीय असून, ती सी. बी. एस. येथे जात असताना प्रिया हॉटेलजवळ आली असता पाठीमागून आलेल्या आरोपी किरण घुगे (रा. सायखेडा, ता. निफाड याने या मुलीला धक्का मारला.पीडितेने मागे वळून पाहिले असता आरोपी किरण घुगे याने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन घुगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
