नाशिक दिनकर गायकवाड नाशिकच्या पूरस्थितीबाबत लवकरच पुढील बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन एशियन डेव्हलपमेंट बँकचे अधिकारी देशपांडे यांनी बैठकीत बोलताना दिले.
नाशिकच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच उपाय योजना करण्याबाबत एशियन डेव्हलपमेंट बँकेने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत माहिती घेतली. एशियन डेव्हलपमेंट बच्या माध्यमातून राज्यात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी मागील दोन वर्षांपासून तयार केलेल्या अहवालाचा आढावा घेतला मागील दोन वर्षातील पूर परिस्थिती,त्यातून निर्माण होणारे प्रत्र,त्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांवर बैठकीत यर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी जलन शर्मा, मनपा आयुक्त मनीचा खत्री महानगरपालिकेया विविध विभागांचे अधिकारी, जिलाधिकारी आपती निवारण विभागाचे अधिष्ण देशपांडे संध्यासह जलसंपदा धरण वा विविध विभागाचे अधिका-यांनी सहभाग घेतला होता.
या बैठकीत महानगरपालिकेच्या वतीने तातडीने करावयाच्या उपायोजना, पूर परिस्थितीवर नियंत्रणासाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या कामांचा आढावा सादर करण्यात आला.मागील दोन वर्षाच्या पूर परिस्थितीची माहिती वित्रफितीद्वारे सादर करण्यात आली. त्यात प्रामुख्याने नदीपात्रांचा विस्तार करणे, नदीचे खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढणे धरणा परिसरामध्ये साचलेला गाळ काढून याची खोली वाढविणे बाबत चर्चा करण्यात आली.
