नाशिक दिनकर गायकवाड आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात जानोरी येथे होणाऱ्या पर्वणीसाठी विकासकामे करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मा.सदस्य सुनील घुमरे यांनी केला आहे.
जानोरी नाशिक एअरपोर्ट या ठिकाणी दिगंबर आखाड्याशी निगडित प्रमुख चौकी आहे. या ठिकाणी गत कुंभमेळ्यात २५ ऑगस्ट २०१५ रोजी जानोरी येथे शाही स्नान संत मिरवणूक भोजन बिदागी व जवळपास १५ हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने व साधु-मंहतांनी परिस्थितीचा विचार करून त्यावेळेला सुविधा नसतानाही ध्वजारोहण सत्संग शाहीस्नान कार्यक्रम झाला.
पुढे येणाऱ्या २०२७ सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी दृष्टिकोनातून बाणगंगा नदीचे खोलीकरण, नदीच्या घाटाची दुरुस्ती तसेच नदीचे घाटे लगत असलेल्या महादेव मंदिर, खंडेराव मंदिर, मारुती मंदिर,शनी मंदिर या ठिकाणी सभामंडप, भक्तनिवास, मंदिरांच्या रंगरंगोटी,भक्त निवास सुधारणा हे कामे होणे गरजेचे आहे.
तसेच या परिसराला जोडणारे प्रमुख रस्ते जानोरी जऊळकेदिंडोरी राष्ट्रीय हायवे क्रमांक तीनला जोडणारा रस्ता, जानोरी-आडगाव जऊळके दिंडोरी नॅशनल हायवे क्रमांक तीनला जोडणारा रस्ता, --जानोरी इरिगेशन कॉलनी शिवनई मार्गे म्हसरूळ नाशिक जोडणारा रस्ता
नाशिक एअरपोर्ट समोरून अक्राळे एमआयडीसी दिंडोरी जाणारा रस्ता, आंबेदिंडोरी मोहाडी - कुर्णोली साकोरा नॅशनल हायवे क्रमांक तीन, कोकणगाव येथे जोडणारा रस्ता, जानोरी १७ नंबर चारी एअरपोर्ट रोड पुढे ओझर नॅशनल हायवे क्रमांक तीनला जोडणारा रस्ता असे विविध रस्ते व मंदिरांचे जिर्णोद्धार, रंगरंगोटी, विकास कामे, पथदीप, स्वागत कमान उभारणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाने याकडे डोळेझाक केले असून तात्काळ या कामाबाबत यापूर्वीच शासन पातळीवर पत्र व्यवहार केला आहे. प्रशासनाने यात प्रामुख्याने लक्ष घालून आगामी २०२७ पूर्वी महत्त्वाच्या विकासाच्या कामांबाबत तात्काळ आराखडा तयार करून निधी तात्काळ वर्ग करावा, अशी मागणी मा. पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे यांनी केली आहे.
