संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या विकासासाठी ‌विधान भवनात बैठक

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या सर्वांगीण विकासासाठी विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
शहराच्या वेगाने वाढणाऱ्या गरजांना पूरक असा दळणवळण आराखडा साकारण्यासाठी, विविध विभागांमधील समन्वयाने निर्णय घेण्यात आले.जागतिक दर्जाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास येत असताना,या ठिकाणची वाहतूक व्यवस्था अधिक सुसंगत होण्याची गरज आहे.

याच अनुषंगाने महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यात 'सिडको ते हर्सूल पॉईंट' रस्ता रुंदीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ प्रस्ताव तयार करावा अशा सूचना दिल्या. इतर मार्गांचाही विस्तार करण्यासाठी विभागाने सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार.संजय शिरसाठ, आमदार.प्रदीप जयस्वाल, आमदार.संजय केणेकर, आमदार सौ.अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त.जी.श्रीकांत आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!