नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क आयकर विभागाने देशभरातील २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली आहे. आयकर रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी सुरु होती. या पद्धतीने करचोरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात आयकर विभागाने चौकशी सुरु आहे. त्या चौकशी अंतर्गत देशभरातील २०० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील एका फर्मची १६ तास चौकशी करण्यात आली.
राजकीय पक्ष आणि इतर संस्थांच्या नावाने खोट्या देणग्या दाखवून करचोरी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे च देशभरातील काही चार्टर्ड अकाउंट क आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स हे यांच्या विरोधात कारवाई करण्यात ने आली. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा समावेश आहे.
देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ८० जी अन्वये ३०० कोटींचा कर चुकवल्याचा संशय आयकर विभागाला आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये विभागाने चौकशी सुरु केली होती. त्यात कर चुकवण्याचे प्रकार समोर आले.
राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीचा संशय आहे. आयकर विभागाने विविध संस्थांचे कार्यालये आणि घरांवर छापे टाकले.फसव्या फाइलिंगमध्ये फायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही लोकांनी जास्त परतावा मिळविण्यासाठी चुकीचे टीडीएस रिटर्न देखील सादर केले होते.