नाशिक दिनकर गायकवाड येथील १७ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की कोमल गोरख पाटील (वय १७) हिचे दि. १ जुलै रोजी आपल्या आईसोबत वाद झाले होते, अशी माहिती तिच्या भावाने पोलिसांना दिली. रागाच्या भरात तिने दार लावून घेत
बेडरूममधील फॅनच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. तिला औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला
तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दिघे करीत आहेत.
