भूषण रामकृष्ण गवई हे ज्येष्ठ आंबेडकरी नेते रा. सु गवई यांचे चिरंजीव.
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारताचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांनी नुकतीच मुंबईतील कुलाबा येथील आपल्या म्हणजे जिथे शिक्षण घेतले ते होली नेम हायस्कूलास नुकतीच सदिच्छा भेट दिली.त्यांनी आपल्या मूळच्या शहरात म्हणजे अमरावती येथे शालेय शिक्षण सुरु केले होते.
त्यांचे वडील मुंबईत आल्यानंतर कुलाब्यातील होली नेम हायस्कुल येथून बी. आर गवई यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते.
पन्नास वर्षानंतर एक मा.विद्यार्थी भारताचा सरन्यायाधीश म्हणून भेट देत आहे ही घटना होली नेम हायस्कुलच्या दृष्टीने खूप अभिमानाची होती.
भारताच्या सरन्यायाधीशांचे आपल्या जुन्या शाळेत स्वागत करण्यासाठी मुंबई सर धर्मप्रांताचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स,बिशप डॉमिनिक साव्हियो फर्नांडिस,शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लॉरेन्शिया आणि व्यवस्थापक फादर कॉन्स्टेशियो उपस्थित होते.
