वकिलावर हल्ला प्रकरणी युवकाला पोलीस कोठडी
नाशिक दिनकर गायकवाड माडसांगवी येथे एका
वकिलावर त्यांच्या कार्यालयात घुसून तीन जणांच्या टोळक्याने नुकताच हल्ला केला.या हल्ल्यात ॲड. रामेश्वर बोराडे (रा. शिलापूर) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.त्यांनी हल्लेखोराला कार्यालयाच्या आवारातच पकडून तैवले होते.
हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी श्रुत नवनाथ कुलथे (रा. देवळाली गाव) यास अटक केली.न्यायालयाने त्यास ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली,
जखमी ॲड.रामेश्वर बोऱ्हाडे माङसांगवी येथे एका बंगल्याच्या आवारात असलेल्या गाळ्यामधील त्यांच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी बोराडे हे बसले होते. यावेळी मुख्य प्रवेशद्वार उघडून तीन जण आत आले. काही समजण्याच्या आतच तिघांनी कार्यालयातील खुर्ची उचलून त्यांच्या दिशेने फेकली व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात येताच शेजारील घरातून
बोराडे यांनी संशयित श्रुत नवनाथ कुलथे यास जमिनीवर ढकलून देत महिलेच्या मदतीने रक्तबंबाळ अवस्थेत पकडून ठेवले.त्यानंतर पोलिसांना १२२ वर कॉल करून
ॲड. रामेश्वर बोराडेंवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास जिल्हा न्यायालयात गुरुवारी आणले आणार असल्याचे समजताच वकिलांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या पाश्वभूमीवर सरकारवाडा गंगापूर व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एक महिला व पुरुषाने बाहेर येत दोन हल्लेखोरांना गेटबाहेर काढले. त्यानंतर दोन जण पळून गेले.
एका हल्लेखोराने बोराडे यांच्यासह मदतीसाठी आलेल्या कार्यालयातील टिळे नामक व्यक्तीच्याही हातावर वार केले. या घटनेत तेही जखमी झाले.
अशी माहिती देण्यात आली आहे जखमी ॲड. बोराडेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वकिलावर हल्ला झाल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी संशयित
ॲड. बोराडेंवरील हल्ल्याची घटना निषेधार्थ आहे.वकिलांच्या संरक्षणासाठी वकील संरक्षण कायदा पारीत झाला पाहिजे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
- ॲड. वैभव शेटे, उपाध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन
