गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी जनता समाधानी
नाशिक दिनकर गायकवाड येथील एक इसम चोरीची रिक्षा विकण्यासाठी पाथर्डी फाट्या जवळील टोयोटा शोरूम परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सापळा रचून तुषार भाऊसाहेब शेजवळ (वय ३८, स्वारबाबानगर, सातपूर) यास अटक केली आहे. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी त्यास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात एमएच रा.१५एफ यू ६२२० या क्रमांकाची रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल होती.
याबाबत समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट २ चे हवालदार सुनील आहेर व अंमलदार तेजरा मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.कामगिरीच्या कतस्वितेसाठी गुन्हे शाखा युनिट-२ वे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक यशवंत बैंडकोबी,
हवालदार सुनील आहेर, प्रकाश बोडके,परमेश्वर दराडे,अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते, हवालदार नंदकुमार नांदुडीकर, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मीक बव्हाण, अंमलदार प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार आदींच्या पथकाने परिश्रम घेतले.
