राहाता प्रतिनिधी शहरातील प्रज्ञा जागृती शिक्षण संस्थेच्या संत जॉन स्कूल शाळेत नुकताच हाऊस ओपनिंग व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेत लाल,हिरवा, पिवळा,निळा या चार गटात सर्व विद्यार्थ्यांची विभागणी करून त्यांचे गटप्रमुख व पूर्ण शाळेचे प्रमुख म्हणून हेड गर्ल व हेड बॉय यांची निवड करण्यात आली.
सर्व गटप्रमुख हेड गर्ल व हेड बॉय यांना शपथविधी देण्यात आला या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवून आणणे हे उद्दिष्टे आहे.विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देऊन त्यांच्यातील नेतृत्व गुण उदयास आणण्यास या उपक्रमातून मदत करण्याचा हेतू आहे.गटवार विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच शालेय अभ्यासाबरोबरच अभ्यासेत्तर उपक्रम राबवून जसे वक्तृत्व स्पर्धा ,निबंध लेखन,सामान्य ज्ञान स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासारख्या अनेक स्पर्धा गटाप्रमाणे घेतल्या जातात व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो.
या कार्यक्रमास राहता पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजे पावसे तसेच राहता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमाव यांच्या सहाय्यक कोमल बिरुटे शाळेचे व्यवस्थापक फादर पॉली डिसिल्वा ,शाळेचे निरीक्षक फादर प्रमोद बोधक तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. चित्ते तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका उषा साळवे या उपस्थित होत्या .
या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी राजेश पावसे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मीना दुशिंग व सौ.धनश्री गायकवाड यांनी केले.आभार विना बोधक यांनी मांडले तसेच श्याम आढाव स्वप्निल शिनगारे यांनी व सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले .
