नाशिक दिनकर गायकवाड नाशिकरोड येथील दत्तमंदिर रोड मोटवानी रोड परिसरातील विनोद अशोक कंदोई यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करणारा जगत्पाल बुधराम सिंग व त्याचा साथीदार सुशील घाट हे दहा लाखा रुपये रोख घेऊन कंदोई यांच्याच मोटार सायकलीवरून फरारी झाले होते. त्यांना गुन्हे शाखा युनिट १ व्या पथकाने बांदवड जवळ मंगरूम फाटा येथे सापळा रखून शिताफीने पकडले.
त्याच्याकडून दहा लाख रुपये रोख व मोटारसायकल असा १० लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या नेप्रकरणी कंदोई यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर आरोपींचा राजस्थान, हरियाना, पंजाब सीमेवर शोध घेतला.दरम्यान हवालदार महेश साळुंखे व अंमलदार राहुल पालखेडे
यांना त्यांच्या खबऱ्या मार्फत माहिती मिळाली, की या गुन्हातील पाहिजे असलेला आरोपी जगत्पाल बुधराम लालन हा त्याच्या स्प्लेंडर मोटारसायकलीवरून एका साथीदारासह चांदवड मार्गे नाशिककडे येत आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश
साळुंके,अंमलदार राहुल पालखेडे, नितीन जगताप, राम बर्डे,आप्पा पानवळ, चालक हवालदार सुकराम पवार यांचे पथक पाठविले. या पथकाने मंगरूळ फाटा येथे सापळा रचला असता माहिती प्रमाणे एमएय १५ जेएस १४७८ वरून दोन व्यक्ती आल्या. त्यांना पकडून त्यांची चौकशी केली असता
जगरपाल बुधराम लालर (वय २४) आणि सुशील शिशुपाल राव (वय २२, दोघेही रा. सोनेडी, ता. नोहर, राजस्थान, सध्या रा. दत हौसिंग सोसायटी, शिवाजीनगर, टाकळी रोड, नाशिकरोड) यांनी कुन्ह्याची कबुली दिली. या दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
