श्रीरामपुरातील सर्वपक्षीय नेत्यांचे पोलीस ठाण्यास निवेदन
श्रीरामपूर दिपक कदम संविधान का? बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना रिपाईच्या वतीने नुकतेच देण्यात आले.
प्रसंगी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे संतोष मोकळ मा.नगरसेवक राजेंद्र सोनवणे मनसेचे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच दिलेले निवेदन पोलिस अधिकाऱ्यांनी स्विकारले.
पोलिस ठाण्यास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या "संविधान का? बदलावे" या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक व प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोह तसेच विविध कलमान्वये व प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२६ जुलै रोजी नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवन येथे ॲड. शिवाजी कोकणे लिखित "संविधान का? बदलावे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात मोठ्या स्वरूपाचे आंदोलने होतील याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.