केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार- राजाभाऊ सरवदे
मुंबई प्नतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक येत्या शनिवार दिनांक २ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालया समोर मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे असून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी;सर्व विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांनी या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि रिपब्लिकन पक्षाची राज्यभरातील सदस्यता मोहिमेचा आढावा रिपब्लिकन पक्षाच्या या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत घेण्यात येणार आहे.राज्यातील राजकीय घडामोडी पाहता आगामी
मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची भूमिका महत्वाची ठरणे असून त्याबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण लक्ष लागले असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या या राज्य कार्यकारिणी बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेबाबत पक्षाध्यक्ष ना. रामदास आठवले पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.त्यामुळे या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या राज्यभरातील जिल्हा अध्यक्ष आणि राज्य कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले आहे.