नाशिक दिनकर गायकवाड-येथील इंदिरानगर प्रभाग २३ मधील अशोका हॉस्पिटलसमोरील संत सावता माळी महाराज मार्ग ते वडाळा आरोग्य केंद्राला जोडणाऱ्या १८ मीटर डीपी रस्त्यावर पावसामुळे लहान मोठे खड्डे मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत जणू हा रस्ताच सलाईन आल्याचे बोलले जातेय.
नाशिक पूर्व विभागातील इंदिरानगर परिसरातील अशोका हॉस्पिटल समोरील सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्र १८ मीटर डी.पी. रस्ता तत्काळ दुरुस्त करून डांबरी करणाचे काम मंजूर करणे बाबत मनपा आयुक्तांना मा. नगरसेवक ॲड. अजिंक्य विजय साने यांनी निवेदन दिले आहे.
त्यामुळे मार्गक्रमण करणे मुश्कील झाले आहे. अनेक महिन्यांपासून सदरचा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.या रस्त्यावरून सद्यःस्थितीत दुचाकी व चारचाकी सोडाच पायी चालणे देखील कठीण झाले आहे. वडाळा गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र १०० फुटी रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे. दिवसभर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. वाहनधारक व पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे मुश्कील झाले आहे.
या ठिकाणी वाहनांचे सतत अपघात होत आहेत. या खड्डेमय रस्त्याची स्थिती लक्षात घेता रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी विलास काश्मिरे, ॲड. राहुल काश्मिरे, किशोर परभणे, प्रवीण बांगर, हेमंत मगनानी, अक्षय पाटील आदींनी केली आहे. संतत धारेमुळे खड्ड्या मध्ये पावसाचे पाणी साचले आहे, त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सभागृह नेते चंद्रकांत खोडे यांनी केली.