मनमाड वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत मांडला

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मनमाड शहरातील वाहतूक कोंडी,अपघातांचे वाढते प्रमाण आणि जुना व कमकुवत रेल्वे ओव्हर ब्रीज पुल यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या व्यथा अखेर विधानसभेच्या पटलावर पोहचल्या आहेत.नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत मनमाड शहरातील वाहतूक कोंडी,उड्डाणपूल,राष्ट्रीय महामार्ग, बाह्यवळण रस्त्याची तातडीने आवश्यकता यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली.
यावेळी आमदार कांदे पुढे म्हणाले की म्हणाले,मनमाड
परिसरातील वृंदावन कॉलनी येथे मूलभूत हे व्यापारी, औद्योगिक व धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे.इंदूर-पुणे महामार्ग, शिर्डी,नाशिक आणि छत्रपती संभाजी-नगरकडे जाणारी वाहतूक शहराच्या मध्यभागातून जाते.

या मार्गावरच भारत पेट्रोलियम,इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियमचे गॅस बॉटलिंग प्लांट तसेच अन्नधान्य महामंडळाचे मोठे गोदाम आहे. त्यामुळे दररोज किमान २५ हजार वाहने या मार्गावरून प्रवास करतात.' या रस्त्यावरच ६० वर्षांपूर्वी बांधलेला रेल्वे पूल आहे,जो सध्या अत्यंत जिर्ण झाला असून दीड वर्षांपूर्वी त्याचा काही भाग कोसळला होता. या पलावरूनही दररोज मोठ्या वाहतूक कोंडी आणि रस्त्याची अडचण ही केवळ गैरसोयी पुरती मर्यादित नसून, ती जीवघेणी ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सन २०२२ मध्ये २१ अपघात, १२ मृत्यू, सन २०२३ मध्ये १५ अपघात, २० मृत्यू, सन २०२४ मध्ये १० अपघात, २० मृत्यू २०२५ (सप्टेंबर अखेर पर्यंत) : ७ अपघात, ८मृत्यू. या अपघातांत अनेकजण जखमी होऊन कायमचे अपंग झाले असून काही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. एका अपघातात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.कोंडीत अनेकदा रुग्णवाहिका अडकतात. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. शाळकरी विद्यार्थी, कार्यालयीन चाकरमानी,व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गंभीर प्रश्नावर आ.कांदे यांनी बाह्यवळण रस्त्याच्या निर्मिती, मालेगाव चौफुली ते ट्रेनिंग कॉलेज दरम्यान उड्डाणपूल उभारणे आणि प्रस्तावित चौपदरीकरण व रेल्वे पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची गरज स्पष्ट केली.

या लक्षवेधी सूचनेवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!