आश्वी संजय गायकवाड राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ॠषीजी महाराज यांच्या १२६ व्या जन्म जयंतीचे औचित्य साधून मॅगन्म मल्टी स्पेशलीस्ट हाॅस्पीटल नाशिक व भारतीय जैन संघटना शाखा आश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे मोफत हृदयरोग निदान शिबीर पार पडले.
आश्वी बुद्रुक येथील जैन स्थानकात मॅगनम मल्टी स्पेशलिस्ट हाॅस्पीटल व भारतीय जैन संघटना आश्वी शाखा अयोजित हृदयरोग निदान उपचार शिबीराचे उदघाटन डाॅ. राहुल शेवाळे डाॅ समाधान बाहेकर भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय शिंगी,
अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे सदस्य व श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी,आश्वी शाखाध्यक्ष सागर रातडीया,राजेंद्र लुणीया,योगेश रातडीया,सुशील भंडारी यांचा हस्ते पार पडले या शिबिरात ग्रामस्थांची रक्तातील साखर, ई सी जी, रक्तदाब, सह सुमारे दहा हृदयरोग तपासण्या मोफत करण्यात आल्या या वेळी डाॅ. राहुल शेवाळे यांनी रुग्णांना हृदयरोगाची कारणे व काळजी या विषयी मार्गदर्शन केले.मोफत शिबीराचा लाभ सुमारे ७० रुग्णांनी घेतला शिबीर यशस्वी करण्यासाठी अथर्व रातडीया,संयम लुंकड, रोशन रातडीया,भुषण भंडारी,कु अमीता भंडारी,यश भंडारी,कुसिया गांधी,कु दिया लुंकड, प्रास्ताविक कु जिनेशा गांधी कु राधिका नाके ,अभिजीत गांधी,विनित गांधी,रोहित भंडारी यांनी केले आभार श्रेणीक बोरा यांनी व्यक्त केले.