आमदार सौ.देवयानी फरांदे यांच्या मागणी बाबत ठोस कारवाई
नाशिक प्नतिनिधी महानगरपालिका हद्दीतील विविध नागरी समस्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनावर तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न:२०२२ साली अचानकपणे कमी करण्यात आलेल्या सुमारे २०० 200 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना आगामी कंत्राटी भरती प्रक्रियेत पुन्हा समाविष्ट करण्यात यावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच,सध्या कार्यरत कंत्राटी वॉलमन कर्मचाऱ्यांचे पगार काही दिवसांपासून थांबवले गेले असून, काही कंत्राटी वाहनचालकांची हजेरी देखील घेतली जात नाही. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
इंदिरानगर पाण्याचा प्रश्न:इंदिरानगर परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न जाणवत आहे. या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनानंतर त्यांनी स्वतः पाहणी करण्याचे आदेश श्री. धारणकर यांना दिले असून, त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
साईनाथ नगर रस्ता समस्या:इंदिरानगरमधील साईनाथ नगर येथे अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येच्या अनुषंगाने आयुक्तांची भेट घेण्यात आली. आयुक्तांनी बांधकाम विभागाला काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
पाणीपुरवठा संदर्भात कारवाई:रविवार कारंजा, पेठे विद्यालय परिसर, गणकर गल्ली, श्रीरामवाडी या भागांतील पाण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आयुक्तांनी धारणकर यांना तातडीचे आदेश दिले आहेत. तसेच, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.