संगमनेर प्रतिनिधी- तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सर्वांच्या अडीअडचणीला सामोरे जाणारे आणि चाणाक्ष बुद्धीने प्रश्न हाताळणारे जेष्ठ कार्यकर्ते दादा पाटील गुंजाळ यांची नुकतीच भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली.
दादा पाटील गुंजाळ हे तालुक्यातील कोल्हेवाडी येथील रहिवासी आहे.त्यांनी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.दिल्ली आणि महाराष्ट्र दरबारी त्यांचा नेहमी सन्मान केला जातो.तालुक्यातच नव्हे तर पुर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहचविण्याचे काम त्यांनी केले.ही निवड हिच त्यांच्या कामाची पावती असल्याचे अभिनंदननीय सुर संपूर्ण जिल्ह्यातून निघत आहे.
त्यांच्या निवडीचे जिल्हाभरातून सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.