नाशिक दिनकर गायकवाड येथील ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड ॲड डिलॅबल्ड या संस्थेच्या वतीने डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटय करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे तसेच सुला वाइनचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव पैठणकर, व्यावसायिक दयाराम पाटील, अशोक नोज उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त करताना नरोटे यांनी लहान मुलांचे कौतुक करून भविष्यात मोठे होऊन आपणही अशा प्रकारचे सामाजिक कार्य करावे,असे सांगून मी संस्थेत
सर्वतोपरी मदत करीन, असा शब्द दिला पैठणकर यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून आपण सदैव संस्थेबरोबर आहोत,असे सांगितले. पाटील यांनी माइया कुटुंबामार्फत व माझ्या राजकीय मदत करीन, असे सांगितले.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी,अध्यक्ष विकास जवन उपाध्यक्ष चंद्रशेखर शहा, महासचिव रामदास जगताप, कार्यकारिणी सदस्य निमिता शेजवळ विद्या जगताप उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गया पठारे, अनिता पठारे,साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे कर्मचारी देणगीदार, दानशूर व्यक्तीचे सहकार्य लाभले.