स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या अंगणगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

Cityline Media
0
एक वही एक पेन उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य

येवला प्नतिनिधी तालुक्यातील आज अंगणगाव येथील वाचनालयात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सालाबाद प्रमाणे अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.
प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे तालुकाध्यक्ष विजय घोडेरावस्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे डाॅ.सुरेश कांबळे अजीज शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष विजय घोडेराव होते प्रसंगी स्वारीपचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे अजीज शेख गोकुळ वाघ किरण जाधव पिटर काळे यांची भाषणे झाली.

मार्गदर्शन करताना डाॅ.सुरेश कांबळे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व विचार आत्मसात केले पाहिजे अण्णाभाऊ साठे यांची डिजे किंवा डोलीबाजा न लावता त्यांच्या कथा कादंबर्‍या वाचून जयंती साजरी केली पाहिजे कारण भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 

यांना त्यांनी गुरू स्थानी मानून त्याचा आदर्श डोळ्या समोर ठेवून ते म्हणतात जग बदल घालवून घाव मज सांगून गेले भिमराव म्हणून आपण सर्वानीच त्यांच्या जयंती निमित्त संकल्प करूयानं कि आज निर्व्यसनी व अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता शिक्षण घेऊन आदर्श पिढी निर्माण करूया असे गौरउदगार डाॅ.सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले.

महेंद्र पगारे म्हणाले कि आम्ही दरवर्षी प्रमाणेच गरजू शाळेतील मुलांना वही पेन वाटप करतो व त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत फक्त दिड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ स्वतःसाक्षर बनून कलावंताना लोकनाट्यच्या माध्यमातून रोजगार

 उपलब्ध करून स्वाभिमानी जीवन जगण्याची संधी निर्माण करून दिली तसेच अनेक कथा कादंबर्‍या वगनाट्य पोवाडे या माध्यमातून जनजागृती केली तसेच रशिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर करून तेथील लोकांची मने जिंकून तरूण पिढीला नवा आदर्श प्रेरणादायी अण्णाभाऊ साठे याच्या रूपाने पहायला मिळाले असे गौरउद्गार महेंद्र पगारे यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब आहिरे यांनी केले तर आभार विनोद त्रिभुवन यांनी मानले यावेळी १०५ शाळेतील गरजू विध्यार्थाना एक वही एक पेन वाटप करण्यात आले.यावेळेस स्वारीपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे डाॅ.सुरेश कांबळे  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे

तालुकाध्यक्ष विजय घोडेराव स्वारीपचे ता.कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन अँड.अनिल झाल्टे भानुदास गायकवाड अजीज शेख पिटर काळे मयुर सोनवणे दिवाकर वाघ बाळासाहेब सोनवणे अतुल धिवर आकाश मोरे नानाभाऊ पिंपळे सचिन जाधव 
राकेश कांबळे सौरव कांबळे नितीन जाधव किशोर जाधव राजु गुंजाळ अमोल गुंजाळ विजय गुंजाळ महीला आघाडीच्या आशा आहेर सौ.शुभांगी कांबळे लक्ष्मीबाई त्रिभुवन शशिकला त्रिभुवन लताबाई जाधव सुनिता राजगिरे कविता वाकळे सारिका उमप सौ.गायकवाड सौ.दुकळे  तसेच स्वारिपचे पदाधिकारी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ अंगणगाव महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!