संगमनेरातील पोकळीस्त नोंदी रद्द करण्याचे काम आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून झाले

Cityline Media
0
इंदिरानगर भागातील रहिवाशांनी व्यक्त केल्या भावना

संगमनेर संजय गायकवाड शहरातील इंदिरानगर भागात गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून अनेक कुटुंबे राहत आहेत मात्र त्यांना जागेचा  प्रत्यक्ष ताबा असूनही महसूल नोंदवहीत अजून ही काही बाह्य व्यक्तींच्या नावाने पोकळीस्त नोंदी आढळून येत आहे.आम्ही अनेक वेळा काँग्रेसचे तत्कालीन महसूलमंत्री आणि पदवीधरचे मा. आमदार आणि मा.नगराध्यक्ष यांच्याकडे गेलो परंतु त्यांनी आमचे काम आजतागायत अर्धवट ठेवले होते परंतु आज हा आमचा महत्त्वाचा प्रश्न खरे नेतृत्व आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागल्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
येथील नागरीकांना आता पर्यत फक्त आश्वासने मिळत गेली होती आणि आज काहीच न करता माजी नेते श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे तो त्यांनी करूच नये,हा फक्त लढा आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळेच लढला गेला आहे त्यामुळे हा त्यांच्या प्रयत्नाचाच खरा विजय असल्याचे इंदिरानगर परिसरातील रहिवाशांनी माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या.

गेल्या अनेक दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील सर्वे नंबर १०६ (४४२) या क्षेत्रात ४० ते ५० वर्षांपासून अनेक कुटुंबं राहत असून,ते नियमितपणे घरपट्टी व नळपट्टीसारखे स्थानिक कर भरत आहेत.

त्यांच्याकडे प्रत्यक्ष ताबा असूनही महसूल नोंदवही मध्ये अजूनही काही बाह्य व्यक्तींच्या नावाने पोकळीस्त नोंदी आढळून येत आहे.त्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांवर गंडांतर येत होते.सदर पोकळीस्त नोंदी रद्द करून प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावे सातबारा उतारे व सिटी सर्वे अभिलेख अद्ययावत करण्यात यावेत,अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात होती.मात्र यापूर्वी या प्रश्नाकडे दुर्लक्षच झाले.या पार्श्वभूमीवरती पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती त्यानंतर आमदार खताळ यांनी स्वतःमंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित तांत्रिक व कायदेशीर प्रक्रियेनंतर लवकरच या रहिवाशांना त्यांच्या हक्काचे मालकी हक्क मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रा कडून मिळाली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोकळीस्त नोंदी रद्द करण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल असे सांगितले ही वार्ता इंदिरानगर भागामध्ये येताच सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि कित्येक वर्षापासून आमचा रखडलेला प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी मार्गी लावला असल्याचे पतित पावन संघटनेचे अध्यक्ष एस.झेड. देशमुख यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मीनाबाई घोडके, वर्षा गोफणे, संगीता गायकवाड,तारा  कोकाटे सुशीला मुर्तडक,मनिषा ठोंबरे, छबूबाई कचरे, बेबी कचरे, राहुल भोईर, कल्पेश पोगुल, मनोज जुंद्रे, नितीन गोरे, अविनाश ओझा, विशाल रागीर, नितीन भालके, स्वरूप गुंजाळ,ओम नाकिल,शंकर मुर्तडक, सोहम जुंद्रे,तनुज घोडके,अक्षय अमृतवाड, मुकेश कचरे आदींनी सांगितले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!