आश्वीच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन मध्यें स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन,आश्वी खुर्द येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी समारंभाचे अध्यक्ष मा. जि.प.सदस्य अण्णासाहेब भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सयाराम शेळके यांनी केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच विविध मनोगते व्यक्त केली. या निमित्ताने विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

देशभक्तीपर गीतांवर आकर्षक कवायती घेण्यात आल्या. कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी व सहकारी दूध संस्था आश्वी खुर्द तर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या समारंभाला विखे पा. कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, सरपंच  सौ.अलका गायकवाड, प्रवरा बँकेचे संचालक बापूसाहेब गायकवाड, उपसरपंच. बाबासाहेब भवर, मा. प्राचार्य विठ्ठल  वर्पे, भाऊसाहेब गाडे  ग्रा.प. सदस्य सोपान सोनवणे, संजय भोसले, सागर भडकवाड, सेवानिवृत्त शिक्षक प्रदिप वाल्हेकर  माणिक गायकवाड, लक्ष्मण सातपुते, राजेंद्र गायकवाड, स्नेहल कुमार भवर, तुषार गायकवाड, दिग्विजय देशमुख,  लष्कर सुभेदार रावसाहेब भडकवाड, डॉ. प्रणव गुणे, रवींद्र डहाळे, मा.प्राचार्य आंधळे ,चांगदेव शिंदे, गोवर्धन सोनवणे, जगदिश मुंन्तोडे , सौ.लीला सोनवणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,मान्यवर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!