नाशिक दिनकर गायकवाड नाशिक- पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर मोठमोठे खड्डे पडल्याने पडल्याने संपूर्ण रस्त्यांचा खेळ खंडोबा' आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे चित्र पहावयास मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून त्वरित या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नाशिक पेठ रस्त्याची जागोजागी झालेली चाळण व मोठ मोठे जीवघेणे खड्डे यामुळे अपघातात झालेली वाढ ढ या राष्ट्रीय महामार्गावर दररोजच अपघाताची मालिका सुरू आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक मोठी वाहने व दुचाकी चालकांना आपला जीव गमविण्याची वेळ आली आहे. या मार्गावरील बागंणी गावानजिक काँक्रिट रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे पडले आहे. दररोज या खड्ड्यात लहान मोठी व अवजड वाहने आपटून वाहनाचे नुकसान तर होतेच मात्र, अपघातांच्या मालिकेत अनेकांना या मार्गावर आपले जीव गमवावे लागले आहेत.दोनच दिवसांपुर्वी वागंणी येथील अनिल प्रधान यांना अज्ञात वाहनाने चिरडले. त्याचा दुचाकीच्या अपघातात चेंदामेंदा झाला होता. बारवार या महामार्गावर घडत असलेले अपघात हे रस्त्यांच्या दुरवस्थेमुळेच घडत असुनही संबधित राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसुन कुठेही कॉक्रिट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांची दुरूस्ती करत नसल्याने वाहन चालकांसह प्रवासी वर्गही त्रस्त झाला आहे. पेठ नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील साबळघाट व कोटंबी घाटातील खड्यांमुळे वारंवार नादुरुस्त वाहने रस्त्याच्या दुतर्फा पडलेली व सभोवतली खड्यांची चाळण यामुळे दररोजच होत असणारा वाहतुकीचा खेळखंडोबा थांबविण्यासाठी संबंधित विभागानेरस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तसेच
वणी येथुन पुढे जाणाऱ्या सापुतारा या रस्त्याची देखील अतिशय दयनीय अवस्था झाली असून वाहन धारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष देवून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी येथील संतप्त नागरिकांनी केली आहे.
नाशिक- वणी सापुतारा सुरत राष्ट्रीय राज्य महामार्गावरील गुजरात राज्याची हद्द समाप्त होताच महाराष्ट्र राज्याची हद्द सुरु होते.आणि हद्द सुरु होताच, ठिकठिकाणी खड्डे रस्त्यावर दिसायला सुरु होते.मात्र,हे खड्डे वाहनचालकाना खुप धोकादायक ठरत आहेत. ठाणापाडा,हतगड भोवरकड्या, चिखली,सराड,अशा ठिकाणी खडे पडले आहेत, या ठिकाणी रात्री बेरात्री,किंवा दाट धुके असल्याने मोटारसायकलस्वार किंवा चारचाकी,वाहनाचे एखादे टायर खड्यात गेले तर खुप मोठे नुकसान होत आहे.टायर फुटणे, टायर पंक्चर होणे, फाटे तुटणे, रिंग बेन्ड होणे,किंवा मोटारसायकल चालक खाली पडून गभीर दुखापती सुद्धा होतात. सुरगाणा तालुक्यातील चिखली ते रोटी दरम्यान सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता पाच ते सहा महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र, सुरू झालेल्या पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
संपूर्ण रस्ता खचल्याने बाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रस्त्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही महिन्यांतच रस्ता खराब झाल्याने सरकारी निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राज्य महागांवरील ठिकठिकाणी खड्डे पडलेले ते सार्वजनिक बाधकाम विभागाने त्वरित बुजवण्यात यावे,अशी मागणी वाहनचालकानी केली आहे.
