' सिंधुताई विखे पा.म्हणजे कठीण परिश्रम व समर्पणाची एक मिसाल' - आण्णासाहेब भोसले
आश्वी संजय गायकवाड लोकनेते खा.डॉ.बाळासाहेब विखे पा. (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला,वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे ' वात्सल्य सिंधू ' सिंधुताई एकनाथ विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रम प्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आण्णासाहेब भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले की, सिंधुताई विखे पा.म्हणजे ' एक कठीण परिश्रम व समर्पणाची एक मिसाल होती.ग्रामीण भागातील लाखो महिलांना त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरेल.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.देविदास दाभाडे यांनी सिंधुताई यांचा जीवनपट व कार्याबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. यानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापिका प्राजक्ता खळदकर यांनी माईंनी स्थापित केलेल्या विविध संस्थांचा उल्लेख करत त्यांनी महिलांना नवे पंख देण्याचे कार्य केले,असे आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले.
सदर प्रसंगी व्यासपीठावर डॉ. सोमनाथ भूमकर व डॉ.सारिका रोहमारे हे ही उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आहेर व प्रा.स्वप्नाली त्रिभुवन यांनी केले. तर मिनीनाथ औताडे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
