गाव तिथे दि बुद्धिट सोसायटी ऑफ इंडियाच्या शाखा उभारणार

Cityline Media
0
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांचा आश्वी खुर्द ग्रामशाखा लोकार्पण प्रसंगी निर्धार

आश्वी संजय गायकवाड मी सारा भारत बौद्धमय करीन हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असून गाव तेथे शाखा उभारणार असल्याचे सुतोवाच संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे सम्यक बुद्ध विहार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेच्या ग्रामशाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी आयोजित सभेत संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड,सरचिटणीस राजेंद्र मुन्तोडे व शहराध्यक्ष विनय घोसाळे व प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ.निता मुन्तोडे यांचे भाषणे झाली.

प्रसंगी जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पवार यांनी पदाधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना दिल्या तर गौतम गोडगे यांनी मंगलमय मनोगत व्यक्त केले.
राजेंद्र मुन्तोडे यांनी ग्रामशाखा कार्यकारिणी घोषित केली यावेळी दत्तराज मुन्तोडे यांची अध्यक्ष तर राजेंद्र मुन्तोडे यांची सरचिटणीस व रावसाहेब मुन्तोडे यांची कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

बुद्धिजीवी वर्गाने समाज ऋणाची परतफेड करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे त्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावण्यासाठी देखील तत्पर राहिले पाहिजे असे मत अनिल मुन्तोडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. प्रस्तावना ग्रामशाखा सरचिटणीस राजेंद्र मुन्तोडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुशिल मुन्तोडे यांनी केले व उपाध्यक्ष श्रीरंग कदम यांनी उपस्थिताचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रणय,बबन, रावसाहेब,कैलास,दिनकर, सूरज,आकाश,अर्जुन,संदीप, प्रतीक,आशुतोष, डॉ. तुषार, डॉ. विशाल,भाऊसाहेब, एकनाथ, अखिल,गौरव,इत्यादी मुन्तोडे परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!