बि.डी.भालेकर शाळा सेमी इंग्लिश पॅटर्न पुन्हा सुरू करण्याची शिक्षणमंत्र्याकडे मागणी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड जुने नाशिक पंचशील नगर गंजमाळ भिमवाडी द्वारका या परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व दर्जेदार शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल यादृष्टीने येथील श्री.बी.डी. भालेकर शाळा सेमी इंग्लिश पॅटर्नने पुन्हा सुरू करण्याबाबत
या मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना येथील शिवसैनिक तथा गुणरत्न आरोग्य फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक डोखे यांनी नुकतेच आपल्या मागणीचे निवेदन दिले.
या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी विनंती  निवेदनाद्वारे केली आहे तसेच म्हटले आहे की येथील, श्री.बि.डी.भालेकर शाळा गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद आहे.या शाळेमध्ये प्रामुख्याने गोरगरीब,
आदिवासी,दलित अशा वंचित व समाजातील दुर्बल घटकांतील मुले शिक्षण घेत होती.

शाळा कार्यरत असताना या मुलांना त्यांच्या परिसरातच मोफत आणि दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत होती.मात्र, कौलाघात सेमी इंग्लिश पॅटर्नच्या अंमलबजावणीमुळे आणि इतर शैक्षणिक बदलांमुळे ही शाळा बंद झाली.परिणामी,गरीब मुलांना लांबच्या शाळांमध्ये जाण्याची वेळ येत असून, त्यातून शैक्षणिक गैरसोय,शाळा सोडण्याचे प्रमाण वाढून शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आणि पालकांचा आर्थिक बोजा वाढला आहे.

म्हणूनच,आमची आपणास नम्र विनंती आहे की, येथील श्री. बि.डी.भालेकर शाळा सेमी इंग्लिश पॅटर्नने तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावी या निवेदनावर शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!