श्रीरामपूर दिपक कदम शहरातील संत लोयोला सदन चर्च, येथे धर्मग्रामाचा आश्रयदाता संत इग्नाथी लोयोलाकर यांच्या सणानिमित्ताने श्रीरामपूर येथील लोयोला सदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
तत्पूर्वी संत इग्नाथी लोयोलोकर यांची नोव्हेना भक्ती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.संतांची नोव्हेना साजरी करतांना पहिले पुष्प गुफनांचा मान निरोप्या मासिकाचे संपादक रे.फा.भाऊसाहेब संसारे यांना मिळाला.त्यांनी संत इग्नाथी आणि धर्म परिषद या विषयावर आपले प्रवचन दिले.
नोव्हेनाचे दुसरे पुष्प अहिल्यानगर सोशल सेंटरचे संचालक रे.फा.सिजु वर्गीस यांनी संत इग्नाथी चिंतनशील कृती करणारा या विषयावर आपले प्रवचन झाले.तर तिसरे टिळकनगर येथील चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.पिटर डिसुझा यांनी संत इग्नाथी युवकांचा आदर्श या विषयावर आपले प्रवचन दिले.
सणाचा शेवटच्या मिस्सा अर्पण करण्याचा मान संभाजीनगर धर्म प्रांताचे महागुरूस्वामी बिशेप रा.रे.लॅन्सी पिंटो यांना मिळाला.या सर्व कार्यक्रमासाठी मुख्य याजक म्हणून संभाजीनगरचे महागुरुस्वामी रा.रेव्ह.लॅन्सी पिंटो यांनी पवित्र मिस्सा अर्पण केली.
ज्ञानमाता विद्यालय संगमनेरचे प्रमुख रे.फा.ज्यो. गायकवाड, रे.फा.विनोद शेळके, लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव, लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.अनिल चक्रनारायण, सेंट झेविअर स्कूलचे प्राचार्य रे.फा.विक्रम शिणगारे,कनोसा होस्टेलच्या प्रमुख सिस्टर रोझली, राफोल भवनच्या प्रमुख सि.रिटा, संत लुक हाॅस्पिटलच्या प्रमुख सिस्टर सरोज यांच्यासह अनेक धर्मगुरू व सिस्टर मोठ्या भक्तीभावाने पवित्र मिस्सामध्ये सहभागी झाले होते.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन फा.हान्स स्टाफनर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य, लोयोला गायन मंडळ, श्रीरामपूर युवक मंडळ, श्रीरामपूर पॅरीस कौन्सिलचे सर्व सभासद, श्रीरामपूर पॅरीस कौन्सिल महिला मंडळ या सर्वांनी मिळून उत्तम नियोजन केले होते.या पवित्र मिस्सामध्ये श्रीरामपूर सह इतर धर्मग्रामाचे भाविक मोठ्या भक्तीभावाने उपस्थित होते.