महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेच्या वतीने वृक्षारोपण
श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३१ जुलै रोजी संत इंग्नाथी लोयोलाकर यांच्या सणानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी लेविन भोसले यांनी संत इग्नाथी लोयोलाकर यांचे आत्मचरित्र सांगितले.तसेच चर्च परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.यावेळी मा.नगराध्यक्ष अनुराधा आदिक,अशोक नाना कानडे,लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा. प्रकाश भालेराव, रे.फा.रत्नाकर दुशिंग, भैय्या शाह,फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक,मा. नगरसेवक राजेश अलग,मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे,मा. नगरसेविका अनिता प्रकाश ढोकणे, चांगदेव देवराय राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित विभाग पार्टीचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनुसूचित विभाग दीपक कदम, एकलव्यचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, डॉ.राजीव साळवे, जेम्स पंडित, लेविन भोसले, रवींद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, बबलू लोंढे, पास्टर दिलीप शेळके, खंडागळे गुरुजी, अशोक पवार सर, भाऊसाहेब आढाव, सौ. प्रतिमा पंडित, लुसिया तपासे, मंगल सगळगिळे, दिलीप सगळगिळे, पत्रकार राजेंद्र सूर्यवंशी, रामदास ढोकणे, अविनाश पोहेकर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे आभार दीपक कदम यांनी मानले.