शहापूर विशाल सावंत- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव,भिवंडी बार कौन्सीलचे अध्यक्ष,फुले आंबेडकरी चळवळीतील लढावू नेते,कोरेगांव भीमा हल्ला प्रकरणात चौकशी आयोगासमोर आंबेडकरी समाजाची बाजू भक्कमपणे मांडणारे,
जातीय अन्याय अत्याचाराच्या विरोधात पिडीतांच्या बाजुने न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढणारे, सामान्य जनतेच्या जगण्या-मरण्याच्या मुलभूत प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलनं उभी करणारे, लढावू नेते,ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील ॲड,किरण चन्ने यांना जातीयवादी सत्ताधारी पक्षाच्या सत्ताधीशांच्या दबावाखाली येवून शांतीनगर पोलीस ठाणे भिवंडी येथील पोलीस प्रशासनाने तद्दन खोट्या गुन्हयात अडकवून अटक करण्यात आली आहे याच्या निषेधार्थ येथील भिम सैनिकांच्या वतीने शहापूर तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की सत्ताधा-यांच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात उठणारा आवाज ईडी,सीबीआय इन्कम टॅक्स व पोलीस यासारख्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करून दडपण्याचा सपाटा इथल्या सत्ताधा-यांनी बेछुटपणे चालवला आहे. ॲड.किरण चन्ने यांना झालेली बेकायदेशीर अटक व खोटा गुन्हा हा त्याचाच एक भाग आहे.महाराष्ट्रातील तमाम फुले आंबेडकरी जनता जातीयवादी सरकारचा हा डाव ओळखून आहे.
आम्ही फुले आंबेडकरी चळवळीचे लोकनेते ॲड.किरण चन्ने. यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा व त्यांना झालेली अटक याचा तिव्र शब्दात निषेध करतो व ॲड चन्ने यांच्या वरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करीत आहोत.
निवेदनावर रिपाईचे शहापूर अध्यक्ष फिरोज शेख शहापूर तालुका सरचिटणीस जोसेफ डिसोझा
शहापूर तालुका सहसचीव प्रविण केदारे बसपा कार्यकर्ते किरण शिंदे खजिनदार महेश भालेराव शहापूर तालुका, युवा अध्यक्ष विकास वाळविंदे सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जाधव यांच्या सह्या आहेत
