मालेगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मालेगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल राजू मुळे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.
या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अनुसूजाती, अनु.जमाती, इतर मागसवर्ग, विशेष मागासवर्ग, विजाभज,अपंग व अनाथ इत्यादी प्रवर्गासाठी एकूण ३८ जागा रिक्त आहेत. प्रवेशासाठी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, 

जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत, रहिवासी दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड / शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती, गॅप प्रमाणपत्र (गॅप असल्यास) व रेशनकार्ड प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे स्वसांक्षाकीत करून मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह, जाजुवाडी, भयगांव रोड, फार्मसी कॉलेजच्या पाठीमागे, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे जमा करावेत.

वसतिगृहात विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा, निवास व्यवस्था, नास्ता, फळे, दोन्ही वेळेचे जेवण हे विनामुल्य आहे. याव्यतिरिक्त निर्वाह भत्ता प्रतिमाह रूपये ५०० हा विद्यार्थ्यांनी दिला जातो, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!