चौपदरी करणापासून वंचित ठेवलेल्या नाशिक दिंडोरी रस्त्याचे भाग्य उजळेल का?

Cityline Media
0
नागरिकांचा संतप्त सवाल

 नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यात चौपदरी करणापासून सर्वात दुर्लक्षित राहिलेला मार्ग म्हणजे नाशिक-दिंडोरी-कळवण रस्ता होय.सिंहस्थ पर्वात या रस्त्याला निधी मिळणार का? अशी विचारणा जनतेकडून होत आहे. रस्त्याचे भाग्य सिंहस्थात तरी उजळावे,अशी अपेक्षा दिंडोरी,कळवण तालुक्यातील वाहनचालक,नागरिक आणि प्रवासी व्यक्त करीत आहेत.
नाशिक, दिंडोरी, कळवण रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी होत आहे. दरवर्षी शेकडो नागरिकांचा बळी तर कित्येकांना अपंगत्व पत्करण्याची वेळ आली असतांनाच सरकारकडुन फक्त

आश्वासनापलीकडे काही मिळालेच नाही हे तितकेच दुर्दैव म्हणावे लागेल.वारंवार मागण्या करूनही या रस्त्याला आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध होत नसल्याने आजही या रस्त्यावर अपघातांची मालिका चालू आहे. मृत्यूचे तांडव सुरूच असल्याचे दिसत आहे. आणखी किती निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागणार की लागल्यावर रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी पूर्ण होईल? या रस्त्याला राष्ट्रीय

महामार्गाचा दर्जा मिळणारच नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

नाशिक - कळवण रस्ता हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. वाहनचालकांकडून खड्डे वाचवतांना देखील अनेक अपघात घडले आहेत. टप्याटप्याने या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी कासवगतीने रस्त्याची

उड्डाण पुलाची गरज दिंडोरीत सुध्दा बाह्यवळण रस्ता किंवा उड्डाण पुलाची गरज आहे.उड्डाणपुलामुळे कोणताही परिणाम उद्योगधंद्यावर होणार नाही.ज्यांना दिंडोरीत काम आहे ते दिंडोरीत थांबणारच आहेत. त्यामुळे उड्डाण पुलाबद्दल अनेक जण सकारात्मक विचार करीत आहेत.बाह्यवळण रस्त्याला मार्ग सुचणे अवघड वाटत आहे. कारण जमीन अधिगृहणाचा खर्च मोठा असणार आहे. त्यामुळे तो पर्याय तरी सध्या शासन विचारात घेत नसल्याचे समजते. सिंहस्थ कुंभमेळा निमित्त या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, अशी अपेक्षा सर्व भाविकांनी व्यक्त केली आहे.

दुरुस्ती सुरु आहे.अपघाती वळणावर आवश्यक उपाययोजना संबंधित विभागाकडून केले जात नसल्याने अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे, खतवड फाटा, पिंपळणारे फाटा, अक्राळे फाटा, वलखेड फाटा, चंडिकापूर फाटा, अहिवंतवाडी फाटा, आठंबे फाटा, साकोरे फाटा, मानूर फाटा आदी ठिकाणी आजही गतिरोधकांची समस्या कायम आहे. या रस्त्यावर दिशादर्शक फलक तसेच आवश्यक वाहतुकीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते.दिंडोरी ग्रामीण रुग्णालय ते सीड फार्मपर्यंत उड्डाण पूल प्रस्तावित असले तरी आजही ते प्रलंबितच आहेत. त्यामुळे दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतूक कोंडी होवून तास न तास वाहनधारक व प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत वाहतूक कोंडीचा फटका दिंडोरीकरांना बसत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!