आश्वी संजय गायकवाड पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी रोवलेल्या सहकाराच्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आणि प्रवरेत सहकाराची पंढरी निर्माण झाली,हिच पंढरी देशातील सहकाराला दिशादर्शक ठरत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आण्णासाहेब भोसले यांनी आश्वी येथे केले.
पद्मश्री डॉ. विठठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेत व कनिष्ट महाविद्यालयात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी विद्यानिकेतनचे प्राचार्य सयाजी शेळके विखे पा. कारखान्याचे मा. संचालक बाळासाहेब मांढरे डॉ.दिनकर गायकवाड सरपंच सौ.अलका बापुसाहेब गायकवाड मा. प्राचार्य विठठल वर्पे भाऊसाहेब गाढे सेवानिवृत शिक्षक अशोक भोसले माणिक गायकवाड संपत भोकरे शिक्षिका सौ.म्हस्के सौ.थेटे आदि मान्यवर उपस्थित होते.
विखे पाटील हे व्यापक विचार, दूरदृष्टी,सर्व विषयाचा सखोल अभ्यास असलेले व शेतकऱ्यांचे कैवारी होते खऱ्या अर्थाने त्यांनी समाजकारणाला व सहकाराला जास्त प्राधान्य दिले व आशिया खंडात पहिला सहकारी तत्वावर साखर कारखान्याची स्थापन केली असे मत यावेळी प्राचार्य सयाजी शेळके यांनी प्रास्तविकात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दिवटे यांनी केले.श्री.रसाळ यांनी आभार मानले. याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.