नाशिक दिनकर गायकवाड नाशिक या मेट्रो पोलिटिन सिटीत अनेक बेघर बांधव लोक विविध कारणान्वे भटकत असतात ते नेहमी अन्नाच्या शोधात असतात म्हणजे त्यांची गरज फक्त भुक असते त्यांच्या समोर भौतिक सुख जवळपास नगण्यच.अशाच एका ७७ वर्षीय बेघर वयोवृद्धास येथील गौतम सोनवणे आणि उल्हास कुलथे यानी सेवाभावी वृत्ती दाखवून आश्रमात दाखल केले.
७७ वर्षीय बेघर वयोवृद्ध नारायण श्रीराम मीराणे यांना स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम,तपोवन, नाशिक येथे दाखल करण्यात या सामाजिक कार्यकर्त्यांनी माणूस्की जपत सेवाभावी वृत्ती दाखविली या कार्यात वृत्तपत्र विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते आणि जन आरोग्य समितीचे समन्वयक गौतम सोनवणे तसेच नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष उल्हास कुलथे यांचे विशेष योगदान लाभले.
यामुळे वयोवृद्ध मीराणे यांना मोफत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध झाली.निवारा केंद्राच्या अटी व शर्तीप्रमाणे त्यांची मेडिकल तपासणी व इतर औपचारिकता पूर्ण करून त्यांना अधिकृतपणे दाखल करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात बिटको हॉस्पिटलचे डॉ. रत्नाकर पगारे, निवारा केंद्राचे व्यवस्थापक संदीप कुयटे,तसेच समूह संघटिका सोनी सोनसळे यांचे सहकार्य लाभले.