१५ ऑगस्टला राज्यात विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.            छाया रेखांकन प्रकाश कदम 
पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यांचे पालकमंत्री / मंत्री

एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे-ठाणे
अजित आशा अनंतराव पवार-बीड
. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे-नागपूर
 राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखेपाटील अहिल्यानगर छगन चंद्रभागा चंद्रकांत-भुजबळ-गोंदिया 
चंद्रकांत सरस्वती बच्चु पाटील-सांगली गिरीश गिता दत्तात्रय महाजन-नाशिक गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
-पालघर गुलाब रेवाबाई रघुनाथ पाटील
-जळगांव दादा रेश्माबाई दगडू भुसे-अमरावती
संजय प्रमीला दुलिचंद राठोड-यवतमाळ उदय स्वरुपा रविंद्र सामंत-रत्नागिरी जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह-रावल,धुळे श्रीमती, पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे-जालना
 अतुल लिलावती मोरेश्वर सावे-नांदेडडॉ.अशोक जनाबाई रामाजी वुईके-चंद्रपूर शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई-सातारा ॲङ आशिष मिनल बाबाजी शेलार-मुंबई उपनगर दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे-वाशिम
कु. आदिती वरदा सुनिल तटकरे-रायगड
शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले-लातूर
ॲङ.माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे-नंदुरबार
 नरहरी सावित्रिबाई सिताराम झिरवाळ-हिंगोली
 संजय सुशिला वामन सावकारे-भंडारा
संजय शकुंतला पांडूरंग शिरसाट
-छत्रपती संभाजीनगर प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक-धाराशिवमकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)-बुलढाणा नितेश निलम नारायण राणे
-सिंधुदुर्गआकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
-अकोला प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर-कोल्हापूर अॅङ आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल-
गडचिरोली पंकज कांचन राजेश भोयर-वर्धा
श्रीमती. मेघना दिपक साकोरे-बोडर्डीकर-परभणी
 
राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास,विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील.विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे हस्ते करण्यात यावे.

असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,असे अवर सचिव सुनील सोनार यांच्या सहीने परिपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!