हेच खरे यात्रा सौंदर्य भाविकांकडून मंडळाचे कौतुक
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले भाविकांचे श्रध्दा स्थान कोकणगाव येथील श्री क्षेत्र निझर्णेश्वर यात्रेत तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त यात्रेत येणाऱ्या भाविकांना भक्ती,उत्साह आणि सेवाभाव यांचा संगम पाहायला मिळाला यावेळी जय हनुमान तरुण मित्र मंडळाच्या सेवाभावी कृतीचे भाविकांनी कौतुक केले.
या पवित्र सोहळ्यात संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील जय हनुमान तरुण मित्र मंडळच्या विवेक डोखे अमोल सारबंदे हारिष उंबरकर गोकुळ सारबंदे रोहीत उंबरकर आदेश उंबरकर नामदेव सारबंदे सागर सारबंदे सुनिल शिंदे वैभव सारबंदे शरद सारबंदे विकास उंबरकर ऋषीकेश हांडे राहुल उंबरकर गोरख उंबरकर रवि सारबंदे कमलेश भुसाळ ओंकार कदम यांनी भाविकांसाठी रात्री बारा वाजल्यापासून अखंड मोफत गरमा गरम चहा- तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून अनोखा सेवाभाव दाखवला.
यात्रेत पाऊल टाकताच भाविकांचे थकलेले चेहरे गरमागरम चहाच्या वासाने उजळून निघाले.मंडळातील कार्यकर्ते प्रत्येक भाविकाचे आपुलकीने स्वागत करत, प्रेमाने चहा देत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची हसू आणि सेवेतली तळमळ पाहून अनेक भाविकांनी "हेच खरे यात्रा सौंदर्य" असे कौतुकाने सांगितले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी या सेवाभावी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.उंबरी बाळापुर गावातील तरुणांनी गेली दहा वर्षापासुन सातत्याने एकदिलाने काम करत यात्रेचा आनंद अधिक खुलवला. "भक्तांच्या सेवेतच ईश्वराची सेवा" हा संदेश या उपक्रमातून जणू प्रत्यक्ष उतरल्याचे भाविकांना जाणवले.
