जात्यांध मानसिकतेतून गावगुंडांनी केला बौद्ध कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला

Cityline Media
0
साळवे कुटुंबीयांवरील भ्याड हल्ला सहन करणार नाही - नामदार आठवले

ससून रुग्णालयात समाज कल्याण मंत्र्यांनी साळवे कुटुंबीयांची घेतली भेट

 संगमनेर नितीनचंद्र भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर येथील गावगुंडांनी जात्यांध मानसिकतेतून जीवघेणा हल्ला केला महाराष्ट्रात बौद्ध समाज संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी जामखेड तालुक्यातील नान्नज येथे तलवार,कोयते व काठ्यांनी  साळवे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाला होता हा संतापजनक प्रकार आहे.मी स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मकोका कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा नामदार आठवले यांनी यावेळी दिला.

पिढीत साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे.आरोपींचे मोबाईल सीडीआर तपासून सूत्रधारांना अटक करावी.अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.नामदार आठवलेंनी पुणे येथील ससून रुग्णालयात जाऊन सुनील साळवे यांच्या जखमी नामदार आठवले यांनी जखमी कुटुंबीयांची भेट घेतली.डॉक्टरांनी अभिजीत साळवे, यशदीप साळवे व रत्नमाला साळवे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.इतर जखमी आदर्श साळवे,रेश्मा साळवे,दिग्विजय सोनवणे व सद्दाम पठाण यांचीही आठवले यांनी विचारपूस केली.

रविवारी रात्री नान्नज, दहा-बारा जणांनी तलवार,कोयते व काठ्यांनी साळवे कुटुंबीयांवर केलेला हा जीवघेणा हल्ला निषेधार्थ असुनटमहिलांनाही गंभीर जखमी करण्यात आले आहे अभिजीत साळवे यांच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असलेल्या या घटनेतील हल्लेखोर गुंडांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी.सर्व आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा.अशी मागणी साळवे कुटुंबीयांनी ना.रामदास आठवले यांच्याकडे केल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली.

या प्रसंगी काकासाहेब खंबाळकर,श्रीकांत भालेराव,
विजय वाकचौरे,परशुराम 
वाडेकर,आशिष गांगुर्डे,संजय सोनवणे,महेंद्र कांबळे,शैलेंद्र चव्हाण,महिपाल वाघमारे,
शशिकला वाघमारे, गणेश साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!