आडमार्ग वळणामुळे रुग्णवाहिका पोहचण्यास असमर्थ
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील आजही मूलभूत सुविधा व रस्ते नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे एकीकडे समृद्धी महामार्ग व सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात असले तरी आजही काही गावात जाण्यासाठी पक्का रस्तासुद्धा तेथे वाहने जावू शकत नाही, त्यामुळे देहरेवाडी येथे गर्भवती महिलेला घेण्यास रुग्णवाहिका पोहोचली नाही. त्यामुळे गर्भवतीलाच दीड किलोमीटर पायपीट करून वाहनापर्यंत चालत यावे लागल्याची घटना घडली.
प्रसूती वेदना होत असतानाही या महिलेला पायी चालत वेदनादायक प्रवास दवाखान्यात जाण्याची वेळ आली. विशेष म्हणजे रुग्ण रुग्णवाहिके पर्यंत येण्यासाठी लागलेला वेळ ही रुग्णवाहिका तेथेच
रुग्णाची वाट पाहत थांबलेली होती.अर्थात यात किमान दीड ते दोन तासाचा वेळ गेला,मात्र कोणताही अनर्थ झाला नाही यातच जाधव कुटुंचियांनी धन्यता मानली. देहरेवाडी येथील अनिता गणेश जाधव या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी सणवाहिकेला बोलवण्यात आले.मात्र या गावाला यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका तब्बल एक ते दीड किलोमीटर लांब असलेल्या पक्क्या रस्त्यावर उभी राहिली. यावेळी रुग्णवाहिका लांच असल्याने
अनिता जाधव यांना एक ते दीड किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागला.यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसूती वेदना होत असतानाही त्यांचा प्रवास सुरूच होता
हा रस्ता अनेक वर्षांपासून देहरेवाडी गावासाठी आम्ही राशेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवरस्त्याची मागणी करत आहोत. मात्र अजूनही आमच्या गावाला रस्ता मिळाला नाही.असे येथील नागरिकांनी सांगितले रस्ता नसल्याने शाळेतील मुलांबरोबरच रुग्णांनाही पायी प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे या गावाला उन्हाळ्यात पाणी नसते तर लाईटची पण पाहिजे अशी व्यवस्था नाही. किमान अशा घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येऊन रस्ता व तत्सम सुविधा गावाला मिळाव्यात.
नसल्याने पायी प्रवास करावा लागला,यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या जाऊबाई सरला जाधव व सासूबाई हिश जाधव यांनी अनिता यांना मानसिक व शारीरिक आधार देत घरापासून सुमारे एक तासाच्या पायी प्रवासाने रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. त्यांना उमराळे येथील दवाखान्यात नेले असता तेथेही त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने शेवटी त्यांना नाशिक येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले.
या ठिकाणी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला,या त्रासाचा प्रवास संपला मात्र हा प्रवास कायमचा संपवण्याची अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.