दिंडोरी मध्ये सुरू असलेल्या महसूल सप्ताहात शासकीय योजनांचा लाभ घ्या-डॉ.शिंदे

Cityline Media
0
 नाशिक दिनकर गायकवाड शासनाकडून १ ऑगस्ट रोजी महसूल दिन व दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह दिंडोरी उपविभागात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे यात नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडोरी-पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी केले.
महसूल सप्ताहात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे उत्कृष्ट कार्य आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांची दखल घेऊन त्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर सप्ताहात कार्यालयांकडून सात दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणे तसेच महसूल प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. दि.१ रोजी महसूल दिन व सप्ताह शुभारंभ, कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट कर्मचारी सन्मान, 

लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, दि. २ रोजी २०११ पूर्वीपासून अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना पट्टे वाटप कार्यक्रम, दि. ३ रोजी पाणंद /शिवरस्त्यांची मोजणी व वृक्षारोपण, दि. ४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणे, 

दि. ५ रोजी विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना डीबीटी अनुदान वाटप, दि. ६ रोजी अतिक्रमण निष्कासन व शर्तभंग प्रकरणांवर कार्यवाही, दि. ७ रोजी धोरणाची अंमलबजावणी, महसूल सप्ताह सांगता समारंभ होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी,

ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, विविध घटकांतील नागरिक यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. नागरिकांनी महसूल सप्ताहात सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडोरी-पेठचे उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!