नुकतेच ससून डॉक मधील मच्छिमार बांधवांनी शिवालय येथे येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांचे आभार मानले. आपला संघर्ष कायम ठेवून एकजूट मजबूत ठेवण्याचे आवाहन ह्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. ह्यावेळी शिवसेना नेते स्थानिक खासदार अरविंद सावंत,शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर,शिवसेना उपनेते अशोक धात्रक,विभागप्रमुख संतोष शिंदे, उपविभागप्रमुख कृष्णा पोवळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
मच्छीमारांना बेघर करणाऱ्या नोटिसा विरोधात लढणाऱ्या शिवसेनेची मच्छीमारांकडून कृतज्ञता
August 03, 2025
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील पोर्ट ट्रस्टकडून ससून डॉक येथील जागेवर हक्क सांगत मच्छिमार बांधवांना घरं सोडून जाण्याच्या नोटीसांविरोधात शिवसेना उबाठा पक्षाने विधीमंडळात जोरदार आवाज उठवून राज्य सरकार कडून तात्पुरता दिलासा मिळवून दिला.
Tags
