आप च्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजात सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्यात आदमी पार्टी नेहमीच अग्रेसर असते, नुकतेच येथे आपल्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच भारतीय स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
श्रीरामपूर शहरात अनेक दिवसांपासून आम आदमी पार्टीच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत,देशाच्या जडणघडणी मध्ये मोलाचे योगदान देणारे देशभक्त महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विचारांना समाजात जिवंत ठेवण्याचे काम आम आदमी पार्टी चे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने केले जाते.

 यावेळी आम आदमीचे विकास डेंगळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांना उजळणी देत मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमात या थोर पुरुषांना अभिवादन करत प्रतिमेचे पूजन केले, या प्रसंगी विकास डेंगळे, राहुल रणपिसे,ज्येष्ठ पत्रकार रमनअण्णा मुथा,काँग्रेसचे शहराध्यक्ष नानासाहेब डावखर भैरव मोरे, अभय गोसावी,भरत डेंगळे,श्रीराम दळवी,श्रीधर कराळे, मनोज गायकवाड,अमोल नवगिरे प्रशांत बागुल मनोज गाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!