नाशिक प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जलसंपदा विभागानं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून नुकतेच उद्घाटन केले.या कार्यालयाच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या अंमलबजावणी कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून,पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना नवसंजीवनी मिळणार आहे.
जलसंधारण,शेती,अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनमान उन्नतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. हे पाऊल म्हणजे “एक महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र” या ध्येयाच्या दिशेने घेतलेली ठोस वाटचाल आहे.
कार्यालयाचे उद्घाटन राधाकृष्ण विखे पा.जलसंपदा मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री. छगन भुजबळ, मंत्री . नरहरी झिरवाळ, मंत्री. माणिकराव कोकाटे, खासदार. भास्करराव भगरे, आमदार. दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार. राहुल ढिकले, आमदार. आशुतोष काळे,. काशिनाथ दाते, आमदार.अमोल खताळ, आमदार. विठ्ठलराव लंघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
