दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क नुकतेच दिल्लीत देशाचे रेल्वे राज्यमंत्री. व्ही. सोमन्ना यांची परभणीचे खा.संजय जाधव तथा शिवसेना उपनेते यांनी भेट घेत गंगाखेड तसंच उर्वरीत परभणी लोकसभा क्षेत्रातील प्रवाशांच्या रेल्वेविषयक मागण्या त्यांच्यापुढे आग्रहपूर्वक मांडत सविस्तर चर्चा केली.
गाडी क्र. १००४६ पुणे-अमरावती एक्सप्रेस (अप/डाऊन) या गाडीला गंगाखेड स्थानकावर कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणी केली.
खालील गाड्यांचे थांबे कोविड काळात बंद झाले होते. ते पुन्हा सुरु करण्याची विनंती केली.
• १७००१ सिकंदराबाद – शिर्डी
• १७२०५ शिर्डी – काकीनाडा
• ११०४६ कोल्हापूर – धनबाद (दिक्षाभूमी एक्सप्रेस)
• ११४०३नागपूर – कोल्हापूर
• १७२०७ सिकंदराबाद – मच्छलीपट्टणम
परळी–मिरज पॅसेंजर गाडीचं मूळ स्थान परळीतून निघण्याऐवजी पूर्णा स्थानक करावं, जेणेकरून अजून चांगली प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आमच्या भागाला मिळू शकेल! प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे पनवेल एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्यांची संख्या वाढवावी. वारीच्या काळात वारकऱ्यांच्या, भाविकांच्या सोयीसाठी वातानुकूलित डबे आणि प्रवासी डबे वाढवण्याची मागणी यात आहे.
निजामाबाद – पंढरपूर पॅसेंजरमध्ये वातानुकूलित डबा व कोच जोडणे. यामुळे वारकरी तसंच लांबच प्रवास करणाऱ्यांना अधिक आरामदायक सेवा मिळतील.वृद्ध, अपंग प्रवाशांसाठी हँडरेल व रॅम्पची उभारणी करा.मतदारसंघातील विविध स्थानकांवर सुसज्ज प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग हॉल उभारण्याची मागणी केली.
पिण्याच्या पाण्याची कायम उपलब्धता असली पाहिजे. अस्वच्छ स्थानकांवर स्वच्छता, देखरेख प्रक्रिया सुधारण्यासाठी विशेष पाऊलं उचलावीत.गंगाखेड रेल्वेस्थानकास बी’ श्रेणीत समाविष्ट करणं. प्रवासी संख्या व वापर पाहता स्टेशनचा दर्जा श्रेणी ‘बी’ मध्ये बदलावा, अशी शिफारस यावेळी मी केली.
वाढती रेल्वे वाहतूक हाताळण्यासाठी तिसरा प्लॅटफॉर्म आवश्यक असल्याचं यावेळी. रेल्वे राज्यमंत्र्यांना सांगितलं.
याबरोबर जालना येथून गाडी क्र. १७६६६३/१७६६४ रायचूर–नांदेड एक्सप्रेसची सुरुवात करावी, गाडी क्र. १७६०८/१७६१० पाटणा–पूर्णा विकली एक्सप्रेस ची सुरुवात जालन्यातून करावी, नवीन गाडी – नांदेड–जोधपूर/जैसलमेर मार्गावर औरंगाबाद–मनमाड–जळगाव–सूरत–अहमदाबाद मार्गे चालवावी अशी आग्रही मागणी यावेळी खा. संजय जाधव यांनी केली