नाशिक दिनकर गायकवाड अज्ञात समाजकंटकाने घरासमोर पार्क केलेल्या दोन गाड्या जाळल्याची घटना मखमलाबाद गावात घडली.
या प्रकरणी भूषण रमेश सोनकांबळे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, मखमलाबाद गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. ३ ऑगस्ट रोजी घरात झोपलेले असताना पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने सोनकांबळे यांच्या
घरासमोर लावलेली रिक्षा क्रमांक एमएच १५ जेए ५२५१ व मोटारसायकल क्रमांक एमएच १५ एफडी ८५७९ कशाच्या तरी सहाय्याने आग लावून ते पळून गेले.
या आगीत सोनकांबळे यांची रिक्षा संपूर्ण जळाली असून, मोटारसायकलीचे देखील नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.