शेवगाव विशाल वाकचौरे- आभासी धर्मांध प्रेरणेने व उपचारांच्या आमिषाने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास भाग पाडत एका महिले सोबत अश्लील वर्तन करणाऱ्या शेवगाव एका धर्मगुरू विरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.दादेगाव रोडवरील अशोक नगर परिसरातील रहिवासी महिलेने (वय४६) यांनी प्रदिप प्रभाकर कोल्हे (रा.आखेगाव रोड, शेवगाव) याच्याविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "धर्मांध प्रेरणेने व उपचाराच्या आमिषाने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न" तसेच "अश्लील वर्तन" आणि "जीवे मारण्याच्या धमक्या" देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकरणाचे सविस्तर वृत्त असे आहे येथील एका महिलेच्या पुतण्याला दीर्घकाळापासून आजार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २०१४ साली प्रदीप कोल्हे हे धर्मगुरु त्यांच्या घरी येऊन, "तुमचा पुतण्या माझ्या प्रार्थनेने बरा होईल, तुम्ही चर्चमध्ये या" असा सल्ला देऊन भास निर्माण केला त्यावर विश्वास ठेवून महिलेचे कुटुंबीय काही दिवस चर्चमध्ये गेले.मात्र उपचाराऐवजी प्रदीप कोल्हे यांनी "तुमच्यासोबत आणखी काही नातेवाईक चर्चमध्ये आणल्यासच उपचार सुरू ठेवेल" असा अट लादली.
त्यानंतर ४ ऑगस्ट २०२४ रोजी महिला व तिची मुले, व इतर नातेवाईक चर्चमध्ये गेले असता प्रदीप कोल्हे यांनी "प्रार्थना करण्याच्या नावाखाली महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले" आणि "हात धरून, मानेवरून हात फिरवून व पदर काढून अपमानित केले". त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी चर्चमध्ये जाणे थांबवले.
त्यामुळे चिडलेल्या कोल्हे यांनी वारंवार घरी येऊन "खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवेल,जीवे मारेल" अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, "भीतीमुळे आजवर तक्रार केली नव्हती. पण आता नातेवाईकांच्या पाठिंब्याने न्याय मिळावा म्हणून पोलिसांत फिर्याद दाखल करत आहे."
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून फिर्याद क्रमांक ०६८१/ २०२५ दाखल केली. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ३५२, ३५१(२), ३५१(३) कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
धार्मिक भावना, जबरदस्तीने धर्मांतर आणि महिला विरोधातील अत्याचार याबाबत योग्य कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा,अशी मागणी होत आहे.
