‘टीप टॉप पांजरपोळ’ आणि ‘आदी घंटाकर्ण ट्रस्ट’तर्फे निस्वार्थ गोसेवेचा गौरव; संघर्षशील गोरक्षकांना मिळाली सामाजिक मान्यता
ठाणे विशाल वाकचौरे गोमातेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या बजरंग दल,संगमनेरच्या गोरक्षक कार्यकर्त्यांचा ठाण्यात नुकताच सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजन ‘टीप टॉप पांजरपोळ’ आणि आदी घंटाकर्ण चॅरिटेबल ट्रस्ट’ या जैन समाजाच्या सेवाभावी संस्थांच्या वतीने करण्यात आले.
गोवंश तस्करी,अवैध कत्तलखाने आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष विरोधात झुंज देणाऱ्या या गोरक्षकांनी शेकडो गोमातांचे प्राण वाचवले आहेत.तेही कुठलीही प्रसिद्धी,मोबदला व पुरस्कार न मागता — केवळ श्रद्धेने आणि धर्मभावनेने. त्यांचे हे निस्वार्थ कार्य आजवर समाजाच्या नजरेआड राहिले, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला योग्य मान्यता मिळाली.
सत्कार समारंभात गोरक्षकांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.या संपूर्ण उपक्रमामागे जे खंबीर आणि निस्वार्थ पाठबळ उभे होते ते म्हणजे पांजरपोळ जीवदया मंडळाचे राजेश दोषी ते या गोरक्षण कार्याचे मूक आधारस्तंभ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, संगमनेर मधील गोरक्षक चळवळ सशक्त करण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
गोरक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "आम्ही लढत राहिलो, पण आमच्याशी खंबीरपणे उभं राहणारी माणसं फार थोडी होती. त्यात राजेश दोषी ह्यांचा हात सदैव पाठीशी होता. त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, "या चळवळीच्या मागे उभं राहणं ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आध्यात्मिक कर्तव्य मानून राजेश दोषी कार्य करतात. त्यांच्या मूक आणि प्रभावी उपस्थिती मुळेच हा उपक्रम शक्य झाला.
हा सन्मान केवळ गोरक्षक कार्यकर्त्यांचा नाही, तर त्या विचारधारेचा आहे जी गोसेवा ही राष्ट्रसेवेसमक मानते. या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांना नव्या जोमाने गोरक्षणाचा संकल्प पुन्हा जागवता आला.
