स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास मंत्रीगण उपस्थित

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित स्नेहभोजन समारंभास मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मंत्रीगण उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी 'विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत' या संकल्पनेबद्दल संवाद साधला. गेल्या दहा वर्षांत भारताने जगातील ११ व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरुन चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे झेप घेतली आहे. या प्रवासात महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा 'पॉवरहाऊस' म्हणून अग्रस्थानी राहिला आहे. परकीय गुंतवणुकीत देशातील जवळपास ४०% वाटा महाराष्ट्राचा आहे. तसेच महाराष्ट्र आज देशाची 'स्टार्टअप कॅपिटल' असून,सर्वाधिक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्स महाराष्ट्रामध्ये आहेत. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण 'विकसित भारत' आणि 'विकसित महाराष्ट्र' घडवण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री  अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल,मुख्यमंत्री सौ.अमृता फडणवीस यांच्यासह विविध देशाचे प्रतिनिधी आणि मंत्रिमंडळातील सहकारी आणि सचिव उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!