लोणी रामेश्वर भोसले आजच्या काळात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हंटीन ऑरगॅनिक प्रा.लि.चे महाराष्ट्र व्यवसाय प्रमुख विनायक पानसरे यांनी केले.
लोणी येथे हंटीन ऑरगॅनिक प्रा.लि.दिल्ली व अॅग्रीस्मार्ट फार्म सोल्यू.लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला, फुलपिके व फळपिके यांच्या कीड - रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले.या चर्चासत्राला अॅग्रीस्मार्टचे.अरुण काळे यांची उपस्थिती होती.
रासायनिक खते व औषधांच्या अतिवापरामुळे जिमिनीची पोषण क्षमता कमी होऊन आवश्यक जिवाणूंचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.परिणामी विविध प्रकारचे रोग व कीटकांना पिके बळी पडतात व उत्पन्न घटते. दिवसेंदिवस खर्च वाढत असताना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आज शेतकरी हताश झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आपली आर्थिक सुबत्ता निर्माण करताना शाश्वत शेती करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारणे व आत्मसात करणे गरजेचे आहे,असे मत व्यक्त केले. रासायनिक शेतीचे जमिनीवर दुष्परिणाम झाले आहेत तसेच मानवी अरोग्याच्याही अनेक समस्या उद्भवल्या त्यांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्याची ताकद फक्त शेती व्यवसायात असून आपण शेतीला व्यवसायाच्या दृष्टीने पहावे,असे आवाहनही त्यांनी केले.
योग्य मार्गदर्शन,योग्य नियोजन व योग्य सेंद्रिय खते व औषधांचा वापर व आलेल्या पिकाचे योग्य विपणन हेच यशस्वी शेतीचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी निर्यात क्षेत्रात उतरून अर्थव्यवस्थेत सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरकरणही यावेळी करण्यात आले. विचारांच्या या मंथनातून नक्कीच आशादायी शाश्वत शेतीचे चित्र पाहायला मिळेल अशी भावना उपस्थित शेतकऱ्यानी व्यक्त केली.
हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी हंटीन ऑरगॅनिक व ॲग्रीस्मार्टच्या संपूर्ण चमूचे योगदान लाभले.आभार प्रदर्शन सुयश वाघमारे यांनी केले.
