दाट लोकवस्तीच्या फुलेनगरात अस्वच्छतेचे साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दाट लोकवस्तीच्या भाग,सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, साचणारे पाणी, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, परिसरात सुटलेली दुर्गंधी अशा परिस्थितीने फुलेनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अशा अवस्थेत येथे लोक राहत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.
पंचवटीतील फुलेनगर परिसर हा नेहमी दुर्लक्षित राहिलेला झोपडपट्टीचा भाग असून, येथे मजुरी करणे, जडीबुटी आणि विविध वस्तूंची विक्री करणारे राहतात. काहींना राहण्याची व्यवस्था असली तरी कुटुंब वाढल्यानंतर जागेची कमतरता भासत असल्याने
पंचवटी: फुलेनगर झोपडपट्टी परिसरात साचलेला कचरा.घराजवळच्या भागात बांबू, पत्रे टाकून झोपड्या उभारण्यात येतात. त्यात कसेबसे दाटीने राहण्याची त्यांच्यावर वेळ येते.त्यामुळे बहुतेक वेळी ते रस्त्यावरच बसलेला दिसतात. येथील रहिवासी रस्त्यावरच कपडे धुणे, स्नान करणे, भांडी धुणे करीत असल्याने ते

पाणी रस्त्यावरून वाहत जाते. त्याची घाण रस्त्यावरच पसरते. त्यात पावसाचे पाणी मिसळत असल्याने त्याची दुर्गंधी या भागात कायम असते. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना तोंडावर रुमाल ठेवल्याशिवाय जाणे शक्य होत नाही. रस्त्यात साचलेल्या सांडपाण्याची
दलदलही येथे अनेक भागात दिसते. 

येथील काही घरांच्या छतावर पावसाचे पाणी साचलेले दिसून येते. या साचलेल्या पाण्यात प्लास्टिकसह इतर कचरा पडतो. सडणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच सातत्याने पाणी साचत असल्याने त्यात डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने डासांमुळे होणाऱ्या आजारांची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

स्वच्छतेच्या बाबतीत या परिसरात दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने ही समस्या अजूनही सुटली नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!